Menu Close

गुजरात दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गुजरातमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण !

२० वर्षांपूर्वी कारसेवकांना जाळून मारल्यामुळे झालेल्या या दंगलीचा सूड घेण्याचा धर्मांध मुसलमान आजही प्रयत्न करत आहेत. हिंदूंनी असा सूड उगवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना वर्षाचे ३६५ दिवसही अपुरे पडतील; मात्र हिंदू सहिष्णु आणि कायदाप्रेमी असल्याने ते नेहमीच अन्यायाच्या विरोधात वैध मार्गाने लढा देतात ! – संपादक 

नवी देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या पुणे गटाने गुजरातमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. काही मासांपूर्वी अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या शाहनवाज आलम या आतंकवाद्याच्या चौकशीतून ही माहिती मिळाली आहे. त्याने सांगितल्यानुसार गुजरातमधील गांधीनगर, कर्णावती, वडोदरा आणि सुरत या शहरांना लक्ष्य करण्यात येणार होते.

आतंकवादी शाहनवाज आलम

शाहनवाज याने सांगितले की, आतंकवादी आक्रमणासाठी इस्लामिक स्टेटचे २ आतंकवादी पुणे येथून कर्णावती येथे गेले होते. तेथे ते २ दिवस राहिले होते. त्यांनी तेथील रेल्वे स्थानके, चित्रपटगृह, विश्‍वविद्यालय, सभागृह, मशिदी, साबरमती आश्रम, न्यायालये, रा.स्व. संघ अन् विहिंप यांची कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणांची माहिती गोळा केली होती. तेथील छायाचित्रे काढली होती आणि व्हिडिओही त्यांनी बनवले होते. त्यानंतर ते माघारी परतले होते. त्यांना पाकिस्तानमधील त्यांच्या अबू सुलेमान या प्रमुखाकडून आदेश मिळाल्यानंतर ते कट कसा पूर्ण करायचा हे ठरवणार होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *