Menu Close

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

  • ‘मुसलमानबहुल भागात फेरी काढू नका’, असे सांगत मशिदीजवळ तलवार आणि दगडफेक यांद्वारे आक्रमण

  • दगडफेक करण्यात मुसलमान महिलांचाही सहभाग !

  • ज्या मशिदींवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, त्या मशिदी बुलडोझरद्वारे पाडून टाकण्याची मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्चर्य वाटू नये !
  • मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे धर्मांधांचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
  • एखादा भाग, गाव, तालुका, शहर, जिल्हा, राज्य आणि देश मुसलमानबहुल झाल्यावर काय होते ? हे आतापर्यंत हिंदूंनी अनुभवले आहे. जो भाग हिंदूबहुल असतो, तेथे मुसलमान निवांतपणे जगू शकतात; मात्र जेथे मुसलमान बहुसंख्य असतात तेथे हिंदूंचा वंशसंहार होतो ! हे कायमचे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक

शाजापूर (मध्यप्रदेश) – २२ जानेवारी या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिरात भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी हिंदु समाजाकडून प्रतिदिन संध्याकाळची फेरी काढण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी अडवली आणि शिवीगाळ करत फेरीवर दगडफेक केली. या घटनेत हिंदु समुदायातील ६ जण गंभीररित्या घायाळ झाले. त्यानंतर हिंदु संघटनेच्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आणि आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी ४४ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सौजन्य : News18 MP Chhattisgarh 

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, काही मुसलमान तलवारी घेऊन हिंदूंना मारण्यासाठी धावले. जमावामधून मंजूर खान नावाच्या व्यक्तीने फेरीतील हिंदूंवर तलवारीने आक्रमण केले. त्यात ललित कुशवाह याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव चालू झाला. दगडफेकीत कुणाल देवतवाल, ढोली सोनू मालवीय, प्रशांत कुशवाह, चेतन प्रजापती, निखिल प्रजापती इत्यादी घायाळ झाले. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *