बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
पाटलीपुत्रा (बिहार) – बिहारची राजधानी पाटलीपुत्रामध्ये एका हिंदु महिला पोलीस शिपाईमवेत ‘लव्ह जिहाद’ची घटना घडल्याचे समोर आले आहे. सगीर अन्सारी नावाच्या मुसलमान तरुणाने या महिला पोलीस शिपायाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. जेव्हा तिला सगीर अन्सारी मुसलमान असल्याचे समजले, तेव्हा तिने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला. यानंतर आरोपी तरुणाने सामाजिक प्रसारमाध्यमांवर बनावट खाते सिद्ध करून पीडित महिलेची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करून तिला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेने सगीर अन्सारीच्या विरोधात बुद्ध कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी सगीर अन्सारीच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, तिची सगीर अन्सारीशी १ वर्षापासून मैत्री होती. या वेळी सगीर अन्सारीने त्याचा धर्म लपवून महिलेशी मैत्री केली आणि तिच्याशी संबंध वाढवले. या कालावधीत आरोपीने अनेक वेळा तिचा विनयभंग केला आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पीडित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
स्त्रोत : सनातन प्रभात मराठी