पुणे : दुधाच्या पिकअप गाडीतून गोमांसाची वाहतूक करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पोलिसांनी गोमांसाने भरलेली पिकअप गाडी जप्त करून ५ जणांना अटक केली आहे. मात्र, गाडीचा चालक फरार झाला आहे.
१. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रविवारी पहाटे एक पिकअप गाडी पुण्याच्या दिशेने येत होती. या गाडीवर अमूल दूध याची जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे लोकांना ही गाडी दुधाची वाटत होती.
२. ही गाडी जेव्हा पुण्यातील कोरेगाव भीमा परिसरात आली तेव्हा त्यामागे एक इनोव्हा गाडी होती. या इनोव्हा गाडीतील लोक या गाडीवर लक्ष ठेवत होते. ही इनोव्हा गाडी काही काळ पुढे जायची तर काही वेळा थांबलेली असायची.
३. गोरक्षक स्वामी यांना दोन्ही वाहनांच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. यानंतर स्वामी यांनी इतर काही गोरक्षकांना फोन करून खराडी चौकात येण्यास सांगितले.
४. त्यानुसार खराडी बायपास चौकामध्ये उपेंद्र बलकवडे, स्वप्निल दांडेकर यांनी गाडी अडवली असता पिक अपचा ड्रायव्हर पळून गेला. यावेळी स्वामी यांची चारचाकी इनोव्हा गाडीला आडवी लावली. तसेच पोलिसांशी संपर्क साधला.
५. या पिकअपची तपासणी केली असता त्यातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले.
संशय येऊ नये म्हणुन गाडीला दुध कंपनीची जाहिरात अन् भगवा झेंडा
पिकअप गाडीला बाहेरून अमोल दुधाची जाहिरात लावली होती जेणेकरून लोकांना संशय येऊ नये. तसेच या गाडीवर भगवा झेंडा कोरला होता. काही वेळात पोलिस हजर झाले मात्र त्यापूर्वी चालक फरार झाला. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली. पशुवैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केली असता त्यात १६ गायींचे गोमांस असल्याचे निष्पन्न झाले. सदर गोमांस जप्त करून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची विल्हेवाट लावली. याप्रकरणी पाच अरोपींना अटक केली आहे.
संदर्भ : दिव्य मराठी