Menu Close

पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !

  • कर्नाटकात श्रीराममंदिर विरोधी काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडणे आश्‍चर्यजनक म्हणता येणार नाही ! हिंदूंनी आता काँग्रेसला निवडणुकीद्वारे राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक आहे !
  • कोट्यवधी रामभक्त हिंदूंच्या देशात त्यांच्यावर आक्रमण होण्यावर प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा ! – संपादक 

पुत्तुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनानिमित्त घरोघरी अक्षता वितरणाचा कार्यक्रम उत्साहाने होत असतांना येथे अक्षता वितरण संचालकांवर आक्रमण झाल्याची घटना नुकतीच घडली.

हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि अक्षता वितरण संचालक संतोष हे मुंडुरू येथे घरोघरी अक्षता वितरण करत होते. त्या वेळी त्यांना अक्षता वितरणास विरोध करणार्‍या गटाने त्यांच्यावर आक्रमण केले. संतोष यांचा बचाव करण्यास आलेल्या त्यांच्या आईवरही आक्रमण करण्यात आले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

स्थानिक निवासी धनंजय आणि त्याच्या गटाने हे कृत्य केले आहे. पुत्तुरूचे माजी आमदार संजीव मठांदुरू यांनी या आक्रमणाचा निषेध केला असून ‘हे राजकीय आक्रमण असून पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना त्वरित अटक करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *