Menu Close

बंगालमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या सरकारी सुट्ट्या रहित, तर ‘शब-ए-बारात’ला सुटी !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल दुसरा बांगलादेश झाला आहे ! बंगालमधील हिंदू आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच एकमेव उपाय आहे ! – संपादक

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व भाजपचे आमदार सुवेंदु अधिकारी

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या वर्ष २०२४ च्या सरकारी दिनदर्शिकेमध्ये मकरसंक्रांत आणि श्रीरामनवमी या दिवशी असणार्‍या सुट्या रहित करण्यात आल्या आहेत, तर ‘शब-ए-बारात’ या मुसलमानांच्या सणाला सुटी देण्यात आली आहे. यामुळे भाजपने टीका केली आहे.

१. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ममता बॅनर्जी उघडपणे मुसलमानांचे लांगूलचालन करू लागल्या आहेत. पाकिस्तानातही शब-ए-बारातला सुटी नसते; मात्र ममत बॅनर्जी मुसलमानांच्या मतांसाठी जाणीवपूर्वक लांगूलचालन करत आहेत.

२. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी सरकारची बाजू मांडतांना म्हटले की, राज्यात हिंदू असो कि मुसलमान सर्व जण एकत्र आणि मिळून मिसळून रहात आहेत. दिनदर्शिकेचे सूत्र हे सरकारचे सूत्र असून भाजप जाणीवपूर्वक त्यावरून धार्मिक उन्माद पसरवू पहात आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *