Menu Close

अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या धर्मांध पिता-पुत्रांना अटक !

  • या घटनेविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • इतका द्वेष मनात भरलेले धर्मांध मुसलमान भविष्यात श्रीराममंदिरावर आक्रमण करण्यासही मागे-पुढे पहाणार नाहीत. हे लक्षात घेता धर्मांधांना असे करण्याचे धाडस होणार नाही, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! -संपादक 

राजगड (मध्यप्रदेश) – येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्‍या रामभक्तांना  बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्‍या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली आहे. नील पटेल आणि देव पटेल गुजरातमधून अयोध्येला जात असतांना मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे पोचले असता ही घटना घडली.

सारंगपूर येथे नील आणि देव पटेल पोचले असता त्यांच्या जवळ लोक गोळा झाली. त्यांनी या दोघांना ‘तुम्ही कुठे जात आहात ?’, असे विचारले. त्यावर पटेल यांनी अयोध्येला जात असल्याचे सांगितले. त्या वेळी येथे उपस्थित असगर खान याने दोघांना, ‘तुम्ही अयोध्येपर्यंत पोचू शकत नाही; कारण तुम्हाला बाँबने उडवून देणार आहोत’, अशी धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ अन्य एका व्यक्तीने बनवला. या वेळी खान याच्या मुलाने नील आणि देव पटेल यांना शिवीगाळ केली. या धमकीमुळे पटेल यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी असगर खान आणि त्याच्या मुलगा यांना अटक केली.

(सौजन्य : MHARO RAJGARH)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *