Menu Close

कोलार (कर्नाटक) येथे धर्मांधांनी फाडला श्रीराममंदिराचा फलक

दोघांना अटक

  • कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अन्य मंत्री आणि काँग्रेसचे नेते भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या विरोधात विधाने करत असल्याने धर्मांधांनी मंदिराचा फलक फाडला, यात आश्‍चर्य ते काय ?
  • टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणार्‍या आणि श्रीराममंदिराचा द्वेष करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या राज्यातील हिंदूंना आतातरी शहाणपण आले असेल, हीच अपेक्षा ! -संपादक 

कोलार (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या २२ जानेवारीच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लावलेला श्रीरामाचा फ्लेक्स फलक अज्ञातांनी ब्लेडद्वारे फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुळबागीलू  गावाच्या गुणीगंटिपाळ्य येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दोघांपैकी एकाचे नाव जहीर असल्याचे उघड झाले आहे. फलक फाडल्याच्या घटनेमुळे मुळबागीलू गावात तणावाचे वातावरणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *