हिंदु कर्मचार्यांनी टिळा लावला किंवा कार्यालयात सत्यनारायणाची पूजा केल्यावर त्यांना ‘राज्यघटना निधर्मी आहे’, असा उपदेशाचा डोस पाजणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठे असतात ? -संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – शुक्रवारी नमाज पढण्यासाठी न्यायालयीन कामकाज अर्ध्यावर सोडणार्या अधिवक्त्यांच्या वर्तणुकीविषयी येथील एका राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी खेद व्यक्त केला. न्यायाधीश त्रिपाठी म्हणाले, ‘‘काम करणे ही पूजा आहे’, हे अधिवक्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या न्यायिक कर्तव्याचा आदर केला पाहिजे.’’ यासह न्यायालयाने अवैध धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपींना ‘न्याय मित्र’ (अॅमिकस क्युरी) देण्याचे आदेश दिला, जेणेकरून मुसलमान अधिवक्त्यांनी नमाजपठणासाठी न्यायालयीन कामकाज सोडल्यास ‘न्याय मित्र’ सुनावणी चालू ठेवू शकतील.
१. न्यायाधीश त्रिपाठी यांनी अवैध धर्मांतराच्या प्रकरणी आरोपी मौलाना कलीमुद्दीन आणि इतर यांच्या विरोधातील फौजदारी खटल्याच्या सुनावणीच्या वेळी हा आदेश दिला. आरोपी मौलानाच्या वतीने काही कागदपत्रांची मागणी करणार्या अधिवक्त्यांची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
२. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदारांच्या उलटतपासणीची वेळ निश्चित करण्यात आली होती. दुपारी १२.२० वाजता अधिवक्ता महंमद आमिर नदवी आणि अधिवक्ता झिया-उल-जिलानी यांनी न्यायालयाला सांगितले, ‘आज शुक्रवार असल्याने आम्ही न्यायालयीन कामकाज पुढे चालू ठेवू शकणार नाहीत.’
३. न्यायालयाने त्यांना सांगितले, ‘नमाजपठणासाठी तुम्हाला न्यायालयाच्या बाहेर जाऊ देणे योग्य होणार नाही. मुसलमान अधिवक्ता नमाजपठणासाठी न्यायालयाच्या बाहेर जात राहिल्यास सुनावणी पूर्ण होणार नाही.’
४. न्यायालयाने सूचना करूनही अधिवक्त्यांनी न्यायालयीन कामकाज सोडले. (न्यायाधिशांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणारे धर्मांध अधिवक्ता ! – संपादक) नंतर अधिवक्त्यांना चेतावणी देतांना न्यायालयाने खटल्याची कार्यवाही स्थगित केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात