Menu Close

येणार्‍या काळात हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणारच आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

श्री. किरण दुसे यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित श्रीरामभक्त

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) – हिंदु समाजाचा यापुढील प्रवास हा श्रीराम मंदिरापासून ते श्रीराम राज्यापर्यंतचा आहे. धर्मद्रोही लोकांनी कितीही विरोध केला, तरी रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचा सूर्योदय होणार आहे. त्यासाठी अविरत कार्यरत रहाण्याचा संकल्प करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. २२ जानेवारीला प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने उंचगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. त्या निमित्ताने १९ जानेवारीच्या रात्री आयोजित कार्यक्रमात ‘रामराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर ते बोलत होते. याचा लाभ ५०० हून श्रीरामभक्तांनी घेतला.

या प्रसंगी समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी यांचा आयोजकांनी शाल अन् श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप जंगम यांनी केले.

विशेष

कार्यक्रम असलेल्या परिसरात ‘श्रीरामकथा’ ही डिजिटल फ्लेक्सद्वारे लोकांना वाचण्यासाठी लावण्यात आली आहे.

उंचगाव श्रीराममय झाले !

उंचगाव गाव हे श्रीराममय झाले आहे. प्रत्येक चौकात भगवे झेंडे, श्रीरामाच्या प्रतिमा, प्रत्येक चौकातील खांबावर ध्वनीक्षेपकावर श्रीरामाची गीते लावण्यात आली आहेत. यात श्रीरामभक्त सर्वश्री विनायक माने, शरद रेडेकर, आनंदा घाडगे, उमेश देशमुख, दत्तात्रय तोरस्कर, धीरज निकम, अवधूत नाकाडे, अशोक चव्हाण, सूरज रुईकर, जयप्रकाश वर्धम्, मंगेश जाधव, सुनील माने यांचा पुढाकार आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *