Menu Close

झारखंड आणि बंगाल राज्यांतील विविध मंदिरांमध्ये स्वच्छता अन् रामराज्यासाठी प्रार्थना यांचे कार्यक्रम पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ !

धनबाद (झारखंड) – अयोध्येमध्ये झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झारखंड येथील श्री हनुमान मंदिर, झोन ३, बिरसानगर, जमशेदपूर; राणी सती मंदिर, कतरास; शिव मंदिर, बरमसिया, धनबाद आदी अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली, तसेच ‘रामराज्य’ स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली. यासमवेतच बंगालमधील कोलकाता, हावडा, तसेच झारखंडमध्ये रांची, हजारीबाग, बोकारो, धनबाद, देवघर आणि कतरास येथील अनेक मंदिरांमध्ये वरील उपक्रम घेण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण : कतरास, झारखंड येथील उपक्रमामध्ये सनातन संस्थेचे पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. झारखंडमधील उपक्रमांमध्ये समाजातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *