Menu Close

उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या ११७ मदरशांमध्ये श्रीरामाची कथा शिकवली जाणार !

उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे. केवळ श्रीरामच नव्हे, तर हिंदूंच्या प्रत्येक देवतेविषयीचे शिक्षण दिले पाहिजे जेणेकरून मदरशांतून शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होतील आणि ते भारताचे आदर्श नागरिक होतील ! – संपादक 

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्‍या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत.

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, यावर्षी मार्चमध्ये प्रारंभ होणार्‍या सत्रात नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. श्रीराम हे प्रत्येकासाठी अनुकरणीय आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे. वडिलांना त्यांचे वचन पूर्ण करण्यास साहाय्य करण्यासाठी श्रीराम सिंहासन सोडून वनात गेले. श्रीरामसारखा मुलगा कुणाला नको असेल ? मदरशातील विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद यांच्यासमवेत श्रीरामांचे जीवनही शिकवले जाईल.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *