Menu Close

हावडा (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांकडून श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण

  • स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड

  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूंचे रक्षण करण्यास अपयशी ! – भाजपचा आरोप

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे ! -संपादक 

धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर केलेले आक्रमण

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या हावडा येथे २४ जानेवारीच्या रात्री बेलीलियास मार्गावरील प्रभाग क्रमांक १७ येथे धर्मांध मुसलमानांनी श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण केले. या वेळी स्थानिक शिवमंदिराचीही तोडफोड करण्यात आली, अशी माहिती बंगालचे भाजपचे सहनिरीक्षक अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली.

मालवीय यांनी यात पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ सुरक्षा पुरवण्यातच अपयशी ठरल्या नाहीत, तर त्यांनी त्यांच्या सर्वधर्मसभेत जातीयवादी भाषणे दिली. यामुळे धार्मिक हिंसाचार झाला. कोलकाता उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांना दिले होते; मात्र ममता बॅनर्जी त्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करत आहेत. पंतप्रधानांचे कार्यक्रम थांबवण्याऐवजी राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व हिंदूंसह बंगालमधील सर्व नागरिकांना सुरक्षा पुरवावी. राज्य भाजपने पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे; पण ममता बॅनर्जी काही कारवाई करतील, अशी आशा नाही.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *