Menu Close

सुतारदरा (पुणे) येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे (महाराष्ट्र) – येथील सुतारदरा भागात २६ जानेवारीला १६-१७ जणांच्या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. (हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकार धर्मांतरबंदी कायदा केव्हा करणार ? – संपादक) याविषयी माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी हा धर्मांतराचा डाव उधळला आणि ३ कुटुंबांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले. ‘स्वारद फाउंडेशन’च्या संस्थापिका स्वातीताई मोहोळ, रवींद्र पडवळ, ऋतुजा माने, महेश खोपकर, किसन काळोखे, रवींद्र शेळके, ‘ओम साई मित्र मंडळा’तील युवक आणि दत्तनगर परिसरातील स्थानिक महिला अन् युवक यांनी धर्मांतर करायला आलेल्या मिशनर्‍यांना पकडले आणि त्यांना शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे कारवाईसाठी पोलिसांच्या कह्यात दिले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *