Menu Close

वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानात १२१ हिंदु महिलांचे धर्मांतर करून बलात्कार !

  • पाकमधील हिंदूंचा नरसंहार आणि अत्याचार यांची भयावह आकडेवारी सांगणारा अहवाल प्रसारित !

  • हिंदु अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी कार्य करणारे मुंबई येथील महेश वासू यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली माहिती !

  • पाकिस्तानातील असुरक्षित हिंदू !
  • ‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ? भारत सरकारने त्यांना यावरून जाब विचारून भारतात त्यांच्यावर बंदी का घालू नये ? -संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – इस्लामी पाकिस्तान हिंदूंसाठी अक्षरश: नरक बनले आहे. लवकरच तेथे हिंदू हाताच्या बोटावर मोजण्याइतके शेष रहातील कि काय, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अशातच पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी अत्यंत कष्ट घेऊन वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून दाखवला आहे. त्यांनी प्रसारित केलेल्या अहवालात स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा आणि पुराव्यांचा आधार घेतला आहे. याची माहिती त्यांनी ‘सनातन प्रभात’ला पाठवली.

वार्षिक अहवालातील महत्त्वपूर्ण माहिती !

१. जिहादी पाकिस्तानमधील हिंदु महिला अत्यंत असुरक्षित जीवन जगत आहेत. वर्ष २०२३ मध्ये बंदुकीच्या धाकावर अपहरण, बलात्कार, बळजोरीने धर्मांतर आणि विवाहाच्या नावावर देहव्यापार करण्यास बाध्य केल्याच्या तब्बल १२१ घटना समोर आल्या.

२. सामूहिक स्तरावर २ सहस्र २५१ हिंदूंचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले.

३. एका विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करता न आल्याने तिची हत्या करण्यात आली.

४. हिंदु पुरुषांचे अपहरण अथवा बळजोरीने धर्मांतर करणे अथवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, अशा ५ घटना घडल्या.

५. ७८ हिंदूंचे मृतदेह हे झाडांच्या फांद्यांवर अथवा घरांत लटकत असल्याच्या घटना समोर आल्या. यांमध्ये काही जणांचे मृतदेह हे विहिरीतून काढण्यात आल्याचाही समावेश आहे.

६.  हिंदूंच्या लक्ष्यित हिंसा करून हत्या करण्याच्या २५ घटना घडल्या.

७. २१ हिंदूंचे अपहरण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले, तसेच त्यांना गोळीबारात घायाळ करण्यात आले.

८. हिंदूंना अनधिकृतपणे अटक करण्याच्या ३ घटना समोर आल्या.

९. २०१ हिंदु मजुरांना मुसलमान जमीनदारांनी त्यांच्या खासगी कारागृहात बंद केले.

१०. हिंदूंची मंदिरे, घरे अथवा स्मशानभूमी यांच्यावर आक्रमणे झाल्याच्या ७७ घटना घडल्या.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *