निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
निपाणी : देहली विद्यापिठाच्या ‘भारत का स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी याच्याशी संबंधित सर्वांवर त्वरित गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत. यासह हिंदु मंदिरांच्या गाभार्यात स्त्रियांना प्रवेश मागणार्या पुरोगाम्यांमुळे सहस्रो वर्षांच्या प्राचीन धार्मिक प्रथा-परंपरा शासनाने, तसेच न्यायालयाने परस्पर मोडीत काढू नयेत. त्याविषयी हिंदु धर्मातील धर्माचार्य, शंकराचार्य अथवा काशी विद्वत परिषद यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २६ मे या दिवशी येथे सकाळी ११ वाजता ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान, श्रीराम सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्माभिमानी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन श्री. जुगल वैष्णव यांनी केले.
मान्यवरांची भाषणे…
१. सौ. अलका पाटील, सनातन संस्था – भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्त्री-पुरुष यांच्याविषयी समानता हवी असेल, तर त्या समान नागरी कायदा होण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत.
२. श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती – गोदरेज समूहाचे आदी गोदरेज यांनी गोमांस भक्षण करण्याविषयी वेदांमध्ये लिहिले आहे, तसेच गोमांस आणि मद्यबंदी यांमुळे देशाची आर्थिक हानी झाली आहे, असे म्हटले आहे. या त्यांच्या विचारांचा आम्ही तीव्र विरोध करतो. त्यांनी याविषयी समस्त हिंदुत्ववाद्यांची क्षमा मागितली पाहिजे, तसेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
३. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पोवार यांनीही या वेळी विचार व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात