Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या झारखंडमधील ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

धनबाद (झारखंड) – झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले. या अभियानात समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ हेही सहभागी झाले होते.

श्री. रमेश शिंदे

१. रांची येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ या विषयांवर व्याख्यान

रांची येथील विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांनी येथील ‘हॉटेल ग्रीन एकर्स’मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात झुमरा भागातील अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. त्यामध्ये श्री. रमेश शिंदे यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ यांच्या भयावहतेविषयी सर्वांना अवगत केले, तसेच हलाल अर्थव्यवस्थेवर बंदी आणण्याविषयी उत्तरप्रदेशमध्ये मिळालेल्या यशाविषयी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली. झुमरा, हजारीबाग भागातील धर्मनिष्ठ सर्वश्री अजित यादव, गौतम सिंह आणि भुईयान यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

कतरास येथील सरस्वती शिशु मंदिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे

२. इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्यामडीह, कतरास येथील सरस्वती शिशु मंदिरामध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संस्कृतीची वैशिष्टये आणि लव्ह जिहादचे वास्तव’, यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक सहभागी झाले होते. शाळेचे विश्‍वस्त श्री. विक्रम राजगडिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी ‘हा कार्यक्रम अतिशय परिणामकारक झाला’, असे सांगितले.

३. ‘हिंदु राष्ट्र समन्वयक समिती, धनबाद’च्या वतीने बैठकीचे आयोजन

‘हिंदु राष्ट्र समन्वयक समिती, धनबाद’च्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तरुण हिंदू, विश्‍व हिंदु परिषद, रा.स्व. संघ, संस्कार भारती, अनुभूति एक एहसास, एकल अभियान आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीत श्री. शिंदे यांनी ‘हिंदु समन्वयक समितीची पुढील दिशा’, या विषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन समन्वयक समितीचे डॉ. निशांत दास यांनी केले.

४. ‘ब्लॅक डायमंड, धनबाद’ या संस्थेत मार्गदर्शन

श्री. रमेश शिंदे यांनी ‘ब्लॅक डायमंड, धनबाद’ संस्थेच्या कर्मचार्‍यांसाठी ‘हलाल जिहादचे दुष्परिणाम’ आणि ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *