-
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचा आदेश !
-
आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करणार !
असा आदेश संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक
जयपूर (राजस्थान) – राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवण्याचा आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये गणवेश लागू करण्याचा आदेश दिला आहे. ‘सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवणे बंधनकारक असून ही मूर्ती शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात येईल’, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे वय आणि लिंग लक्षात घेऊन गणवेश निश्चित केला जाणार आहे.
शाळांमध्ये धर्मांतर होऊ देणार नाही ! – शिक्षणमंत्री
शाळांमध्ये धर्मांतर होऊ देणार नाहीे. ज्या शाळेत श्री सरस्वतीदेवीचे चित्र नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात
0 Comments