Menu Close

श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल – स्वामी रामभद्राचार्य महाराज

स्वामी रामभद्राचार्य महाराज

हाथरस (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुका येत आहेत. राम-सीतेवर प्रेम न करणार्‍या विरोधकांना मतदान न करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली पाहिजे. ‘विरोधक श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) मंदिरात गेले नाहीत, तर त्यांना मते घेण्याचा काय अधिकार आहे ?’, असेही ते म्हणाले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *