Menu Close

मध्यप्रदेशातील बामोरी शहरातील पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड !

गझनीचे वंशज आजही भारतात हिंदुद्वेषी कारवाया करत आहेत, हेच खरे. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक ! -संपादक 

पीपलेश्‍वर महादेव मंदिरातील तोडफोड

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील बामोरी शहरात असलेल्या पीपलेश्‍वर महादेव मंदिरात तोडफोड करण्यात आली. अज्ञातांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून शिवलिंग उपटून रस्त्यावर फेकले आणि नंदीची तोडफोड केली. या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे हिंदू संतप्त झाले असून, ‘पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावे आणि त्यांची घरे पाडावीत’, अशी मागणी केली आहे. धर्मांधांनी ही तोडफोड केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मंदिरात तोडफोड झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही वर्ष २०१३ मध्ये या मंदिराची तोडफोड झाली होती. यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बामोरी येथील सौरभ किरार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. ‘पहाटे ५ वाजता मी मंदिराजवळून जात असताना मला शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड झाल्याचे दिसले’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. किरार यांनी शाहरूख, रिहान, वफाती, अन्वर, झीशान, बिट्टू, रहिश यांनी तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. रात्री १ वाजेपर्यंत हे लोक गावात फिरत असतात.

धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी ७ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून ४ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. पोलीस परिसरातील ‘सीसीटीव्ही’मधील चित्रीकरण पडताळत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *