Menu Close

औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून मशीद बांधली !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने माहिती अधिकारात दिली माहिती

जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ? हा विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे केंद्र सरकारनेही यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक

शाही इदगाह मशीद

आगरा (उत्तरप्रदेश) – आगर्‍याच्या पुरातत्व विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत म्हटले की, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडल्यानंतर औरंगजेबाने बांधलेल्या मशिदीच्या जागेवर शाही इदगाह मशीद बांधण्यात आली आहे. विभागाने ब्रिटिश राजवटीत वर्ष १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजपत्राच्या आधार म्हटले आहे की, पूर्वी मशिदीच्या जागी कटरा केशवदेव मंदिर होते. जे पाडून मशीद बांधण्यात आली.

१. मैनपुरी येथील अजय प्रताप सिंह यांनी माहिती अधिकारात देशभरातील मंदिरांची माहिती मागवली होती. यामध्ये मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाविषयीचीही माहिती मागवण्यात आली होती.

२. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी सांगितले की, ब्रिटिश राजवटीत कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत आणि रस्ते विभागाने उत्तरप्रदेशातील विविध ठिकाणच्या ३९ स्मारकांची सूची प्रसिद्ध केली होती. ही सूची राजपत्रात नोंदवलेल्या माहितीवर आधारित आहे. यात कटरा केशवदेव भूमी येथील श्रीकृष्णभूमीचा उल्लेख ३७ व्या क्रमांकावर आहे. ‘पूर्वी कटरा टेकडीवर केशवदेवाचे मंदिर होते’ असे लिहिले आहे. ते पाडून ती जागा मशिदीसाठी वापरण्यात आली. आम्ही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय येथे पुरावा म्हणून याचा समावेश करू.

काय आहे प्रकरण ?

औरंगजेबाने वर्ष १६७० मध्ये मथुरेतील केशवदेवाचे मंदिर पाडण्याचा आदेश दिला  होता. यानंतर मंदिर पाडून तेथे शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. मथुरेतील हा वाद एकूण १३.३७ एकर भूमीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे. श्रीकृष्णजन्मस्थान न्यासाकडे १०.९ एकर भूमीचा मालकी हक्क आहे, तर शाही ईदगाह मशिदीकडे अडीच एकर भूमीचा मालकी हक्क आहे. हिंदु पक्षाचे म्हणणे आहे की, शाही ईदगाह मशीद हटवून ही भूमी श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला द्यावी, अशी मागणी हिंदूंकडून होत आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *