Menu Close

बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच, न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

आता देशातील मुसलमानांनी बळकावलेली हिंदूंची प्रत्येक ठिकाणे मुक्त करण्याचा काळ आला आहे आणि काळानुसार ते होत आहे. येत्या काही वर्षांत देशातील अशी सर्वच ठिकाणी मुक्त करण्यासाठी हिंदूंनी युद्धापातळीवर प्रयत्न केला पाहिजे ! -संपादक 

बागपत (उत्तरप्रदेश) – महाभारतात ज्या लाक्षागृहाविषयी सांगितले जाते ते सध्या उत्तरप्रदेशातील बागपतच्या बर्नावा येथे आहे. त्यावर मुसलमान वर्ष १९७० पासून दावा करत आहे की, हे लाक्षागृह ‘बद्रुद्दीनची कबर’ आहे. या प्रकरणी गेल्या ५३ वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. न्यायालयाने आता लाक्षागृह हिंदूंना सोपवण्याचा आदेश दिला आहे.

१. बद्रुद्दीनच्या कथित थडग्याच्या आजूबाजूला मुसलमानांचे कब्रस्तानही असल्याचे मुसलमानांचे म्हणणे आहे. ही भूमी वक्फ बोर्डाची असल्याचा त्यांचा दावा आहे. न्यायालयाने मान्य केले की, हे लाक्षागृह आहे, कबर नाही. १०० बिघा भूमी आणि कबरीचे ठिकाण हिंदूंच्या कह्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

२. हिंदु पक्षाचे अधिवक्ता रणवीर सिंह म्हणाले की, आम्ही या भूमीच्या संदर्भातील सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. लाक्षागृहाचा इतिहास महाभारत काळापासूनचा असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. या ठिकाणी संस्कृत शाळा, तसेच महाभारत कालखंडाच्या खुणाही आहेत.

काय आहे लाक्षागृहाचा इतिहास ?

या लाक्षागृहाच्या ठिकाणीच महाभारताच्या काळात दुर्योधनाने पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. पांडवांना मारण्यासाठी कौरवांनी हे लाक्षागृह बांधले होते. लाख, मेण, तूप आणि तेल मिसळून हे लाक्षागृह बनवले होते.

(सौजन्य : Anirudh Singh)

धृतराष्ट्राच्या आदेशाने पांडव येथे रहाण्यास आल्यावर त्याला आग लावण्यात आली होती; पण पांडव एका बोगद्यातून बाहेर आले. बर्नावा येथे हा बोगदा आजही अस्तित्वात आहे.

३. वर्ष १९५३ मध्ये उत्खननाच्या वेळी ४ सहस्र ५०० वर्षे जुन्या महत्त्वाच्या वस्तूही येथे सापडल्या. येथे महाभारत काळातील एक बोगदा आणि पौराणिक भिंती आहेत. पुरातत्व विभागानेही येथून महत्त्वाच्या पुरातन वस्तू कह्यात घेतल्या आहेत. ही जागा आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कह्यात आहे; मात्र वर्ष १९७० मध्ये उत्तरप्रदेश वक्फ बोर्डाने या जागेवर त्याचा हक्क सांगितला होता. वक्फ बोर्डाच्या वतीने मुकीम खान यांनी ‘लाक्षागृह टीला’ ही बद्रुद्दीन शाहची कबर आहे, असा दावा करत हे थडगे आणि आजूबाजूच्या कब्रस्तानावर मालकी हक्काचा दावा प्रविष्ट (दाखल) केला. या प्रकरणात मुकीम खान यांनी ब्रह्मचारी कृष्णदत्तला प्रतिवादी केले होते. आता हे दोघेही जिवंत नाहीत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *