Menu Close

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणार्‍या विरार येथील धर्मांधाला अटक !

  • हिंदूंच्या आक्रमक पावित्र्यानंतर गुन्हा नोंद !

  • औरंगजेब, टिपू सुलतान आदींचेही व्हिडिओतून उदात्तीकरण

  • छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
  • स्वतःहून कारवाई न करणार्‍या अशा पोलिसांवर सरकार कोणती कारवाई करणार आहे ? असे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? -संपादक 
शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन सुफियान याच्या घराजवळ जमून निषेध व्यक्त करतांना धर्माभिमानी हिंदू आणि शिवप्रेमी !

विरार (पालघर, महाराष्ट्र) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या आणि औरंगजेब, टिपू सुलतान आदी मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण करणार्‍या विरार येथील बोळींज, बंदरपाडा येथे रहाणार्‍या सुफीयान अमजद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. बोळींज गावचे भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. महेश राऊत यांनी या विरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता. त्यामुळे शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन सुफियान याच्या घराजवळ जमून निषेध करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ५ फेब्रुवारी या दिवशी सुफीयान याला पोलिसांनी अटक केली आहे. (राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करणारे श्री. महेश राऊत आणि धर्मांधावरील कारवाईसाठी संघटित होणारे जागरूक हिंदू हीच हिंदूंची शक्ती आहे ! – संपादक)

FIR ची प्रत –

https://drive.google.com/file/d/14Yyn4ykEKHV9dN19zds9SAaVmafWjoXd/view

सुफीयान याने ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरून एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदूंच्या हे लक्षात आल्यावर त्याच दिवशी सुफियान याच्या घराच्या येथे शेकडो हिंदू एकत्र जमले आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली. या व्हिडिओमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांना उद्देशून ‘आय अ‍ॅम स्ट्राँगर, आय अ‍ॅम बेटर, आय अ‍ॅम स्मार्टर’, असे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्देशून ‘क्या रे भंगार के शकल के तेरे बाप को भूल गया क्या’, असे म्हटले आहे. हा २४ सेकंदांचा व्हिडिओ असून त्यामध्ये १८ सेंकद आक्षेपार्ह चित्रीकरण आहे. या व्हिडिओतून हिंदूंना अपमानित करण्यात आले आहे, तसेच त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार श्री. महेश राऊत यांनी केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *