Menu Close

‘राम मद्यपी आणि सहस्रो महिलांसोबत रहात होता !’ – उमा इलैक्किया

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सहकारी उमा इलैक्किया यांचा हिंदुद्वेष !

  • सत्ताधारी द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केली, तर त्याच पक्षातील नेत्या हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामावर अश्‍लाघ्य आरोप केले. हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा हा परिणाम होय !
  • अशांचा भरणा असलेला द्रमुक पक्ष एका राज्यावर सत्ता गाजवतो, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! -संपादक 
वर्तुळात उमा इलैक्किया

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या जवळच्या सहकारी उमा इलैक्किया यांनी भगवान श्रीरामावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. उमा इलैक्किया म्हणाल्या, ‘‘वाल्मिकी रामायणानुसार राम राजवाड्यात सहस्रो महिलांसोबत रहात होता आणि तो मद्यपी होता.’’ स्टॅलिन कुटुंबाच्या वतीने चालवल्या जाणार्‍या ‘कलैगनर सेठीगल’ या वृत्तवाहिनीच्या निवेदिका आणि ‘द्रविड कळघम तमिझार पेरीवाई’च्या सरचिटणीस उमा इलैक्किया यांनी श्रीरामाविषयी केलेले अपमानास्पद वक्तव्य सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले असून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.

सौजन्य बक 

उमा इलैक्किया यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने

१. श्रीरामामध्ये जगण्याचे धारिष्ट्य नसल्याने त्याने शरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांसमोर असा आदर्श ठेवणार का ? हा कसला मूर्खपणा ?

२. रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले. राम हा खुनी होता. त्याने समोर न येता लपून वालीचा वध केला. अशा प्रकारची व्यक्ती तुमच्या मुलांसाठी आदर्श आहे का ?’

३. राममंदिर जेथे बांधले आहे, तेथे एकेकाळी मशीद होती.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *