Menu Close

हिंदूंनो, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणण्यासाठी सिद्ध व्हा – काजलदीदी हिंदुस्थानी, व्याख्यात्या, गुजरात

काजलदीदी हिंदुस्थानी

अकोला (महाराष्ट्र) – आज देशात लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा अनेक जिहादांनी हैदोस घातला आहे. धर्मांतराच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राला भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. तरुण मुले आणि मुलींना अमली पदार्थांचे व्यसन लावून, भीती दाखवून, सामाजिक माध्यमांद्वारे जाळे रचून, तसेच चित्रपटांद्वारे सुद्धा भरकटवले जात आहे. हिंदु आताही जागृत झाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन गुजरातच्या व्याख्यात्या काजलदीदी हिंदुस्थानी यांनी केले. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सकल हिंदु समाज यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वीर-वीरांगना संमेलना’मधील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिला आणि तरुणी यांची बहुसंख्य उपस्थिती लाभली.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमापूर्वी महिला आणि तरुणी यांनी २ किलोमीटरपर्यंत भव्य मशाल दिंडी काढली.

२. सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ‘जानकी सिड्स’ या आस्थापनाचे संचालक धर्मप्रमी श्री. संजय ठाकूर शेवटपर्यंत ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी महिलांना लव्ह जिहाद विषय समजावून सांगून ग्रंथ घेण्यास प्रोत्साहित केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *