Menu Close

गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करणार – राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कळत नाही का ? -संपादक 

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर

जयपूर (राजस्थान) – विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशाचे पालन केले पाहिजे. शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कपडे परिधान करणे हा बेशिस्तपणा आहे. एखादा विद्यार्थी हनुमानाचा वेश परिधान करून शाळेत आल्यावर कसे होईल ? त्यामुळे शाळेतील सर्वांनीच गणवेशाच्या नियमांचे पालन करायला हवे, असे आमचे आवाहन आहे. जे गणवेशाच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी चेतावणी राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.

गेल्या आठवड्यात राजस्थानमधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर मदन दिलावर यांनी अशा प्रकारे गणवेशाच्या निमयांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *