Menu Close

आसाम – विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील ख्रिस्ती मिशनरी शाळेतील घटना !

हिंदुविरोधी मदरसे आणि ख्रिस्ती मिशनरी शाळा या आता बंदच करणे आवश्यक आहे. यासाठी आता हिंदु संघटनांनी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! -संपादक 

गौहत्ती (आसाम) – आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील बालीपाराजवळील खेलमती येथील कलवरी इंग्लिश स्कूल या मिशनरी शाळेमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. ही घटना ५ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली होती. या प्रकरणी ‘कुटुंब सुरक्षा परिषद’ या हिंदु संघटनेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे.

१. शाळेच्या चौथ्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने प्रथम वर्गशिक्षकाने आणि नंतर मुख्याध्यापकाने शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली होती. या विद्यार्थ्याने या घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रशासनाकडे या घटनेविषयी स्पष्टीकरण मागितले. या घटनेविषयी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर चारिदुर पोलीस ठाणे आणि जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या पथकाने शाळा व्यवस्थापनाला ‘अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये’ अशी सूचना केली.

२. कुटुंब सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष सत्य रंजन बोरा यांनी आसामचे शिक्षणमंत्री रनोज पेगू यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळा प्राधिकरणाने भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (अ) अंतर्गत बाल हक्क आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे.

३. तसेच या संघटनेने शिक्षकांना ख्रिस्ती धर्मानुसार नाही, तर सर्वसामान्यांप्रमाणे पोशाख घालण्यास सांगितले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *