Menu Close

‘हैदराबाद मुक्तीसंग्रामा’ची विजयगाथा दाखवणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार !

हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. नेहरू-गांधी आणि काँग्रेस यांच्यामुळे इतकी वर्षे त्याविषयी बोलणेही शक्य नव्हते; किंबहुना पुढच्या पिढीतील आणि देशभरातील हिंदू यांच्यापासून ते लपवून ठेवण्यात आले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे ! – संपादक 

‘रझाकार’ चित्रपट

मुंबई – हैदराबादच्या (भाग्यनगरच्या) मुक्तीसंग्रामाची विजयगाथा उलगडणारा  ‘रझाकार’ चित्रपट १ मार्च या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (विज्ञापनासाठी चित्रपटाचा प्रदर्शित केलेला अल्पसा भाग) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये निजामाने हिंदूंचा केलेला नरसंहार, पाकिस्तानने निजामाच्या फुटीरतावादाला केलेले साहाय्य, हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये विलीन करण्यासाठी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी केलेली सैनिकी कारवाई, या काळात निजामाच्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी दिलेला धर्मलढा याचे दाहक वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

( सौजन्य : ADITYA MOVIES )

चित्रपटाद्वारे दाहक वास्तव समोर येणार

१.  हैदराबादचा ७ वा निजाम मीर उस्मान अली खान याने हिंदूंवर केलेल्या क्रूर अत्याचारांचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात आहे. हिंदूंचे धर्मांतर, हिंदु महिलांवरील अत्याचार आणि हिंदूंच्या नरसंहाराची भीषणता या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

२. ‘या तो मजहब बदलना होगा, या फिर ये राज्य छोड़ना होगा’ (एक तर धर्म पालटावा लागेल किंवा राज्य सोडावे लागेल), ‘ओम शब्द सुनाई नहीं देना चाहिए और भगवा रंग दिखाई नहीं देना चाहिए’ (‘ॐ’ चा उच्चार ऐकायला आला नाही पाहिजे आणि भगवा रंग दिसला नाही पाहिजे) आदी निजामाच्या तोंडी असलेली ही वाक्ये हिंदूंवरील अत्याचारांची भयावहता दाखवणारी आहेत.

३. चित्रपटातील ‘मै हैदराबाद को दुसरा काश्मीर बनने नहीं दुंगा’ (मी हैदराबादला दुसरा काश्मीर होऊ देणार नाही), ‘ना संधी, ना समर्पण, युद्ध तो होगा’ (ना संधी, नास समर्पण युद्ध तर होणारच) या संवादावरून वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात घेतलेला आक्रमक पवित्रा याचे वास्तव चित्रण दाखवण्यात आल्याचे लक्षात येते. एकूणच चित्रपटातील ‘ट्रेलर’ हिंदूंची विजिगिषु वाढवणारा आहे.

या चित्रपटाची निर्मिती गुडूर नारायण रेड्डी यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सत्यनारायण यांनी केले आहे. या चित्रपटात महेश अचंता, अनसूया भारद्वाज, राज अरूण, मकरंद देशपांडे, अश्‍विनी काळसेकर या प्रसिद्ध कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *