Menu Close

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

विहिंपचे कार्यकर्ते आणि धर्मांतराचे आयोजक यांच्यात हाणामारी !

कठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे ! -संपादक 

भरतपूर (राजस्थान) – येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.

( सौजन्य : Rajasthan 18 News  )

या वेळी विहिंपचे कार्यकर्ते आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणारे यांच्यात वाद झाला. जे लोक धर्मांतर करवून घेणार होते, ते हॉटेलमध्ये पळून जाऊ लागले. कार्यकर्त्यांनी या पैकी १० जणांना पकडले. त्यामुळे आयोजक आणि विहिंपचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही लोकांना अटक केली. यात काही महिलांचा समावेश आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *