वारसास्थळांवर हक्क मिळवण्यासाठी हिंदूंनो दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हा ! -संपादक
मथुरा (उत्तर प्रदेश) – काशीतील ज्ञानवापी वादाच्या पार्श्वभूमीवर आता मथुरेतून नवा वाद समोर आला आहे. मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाजवळ असलेले मुसलमानाचे कथित थडगे ‘ज्ञानवापी’ (हिंदूंचे स्थान) असल्याची माहिती एका हिंदु अधिवक्त्यांनी दिली आहे. पोत्रा कुंडाजवळ चक्रवती सम्राटाचा भाऊ राजा भर्तृहरि यांची समाधी ही ज्ञानवापी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
१. वर्ष १९८७ मध्ये मथुरा नगरपालिकेत कामाला असलेल्या कमरुद्दीन नावाच्या कर अधिकार्याने नोंदीध्ये छेडछाड केली आणि त्यात येथील ‘ज्ञानवापी’चा ‘शाही बावडी’ असा पालट केला. नंतर वक्फ बोर्डाने ती वक्फ क्रमांक ७५ मालमत्ता म्हणून घोषित केली. भर्तृहरींच्या समाधीचे ‘हजरत उमदराज बावडीवाले बाबां’च्या समाधीत रूपांतर करण्यात आले. मुशीर अन्सारी नावाची व्यक्ती सध्या या समाधीची देखभाल करते. मुशीर अन्सारी सांगतात की, ते या समाधीचे तिसर्या पिढीतील सेवक आहेत.
२. वर्ष १९९४ मध्ये हिंदु पक्षाचा युक्तीवाद योग्य असल्याचे पाहून नगरपालिकेने नोंदीमध्ये सुधारणा केली. वर्ष १९९७ मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी तथा वक्फ सर्वेक्षण अधिकारी आर.डी. पालीवाल यांनी मुसलमांनाना येथे नमाजपठण न करण्याचे आदेश दिले; मात्र मुसलमानांनी येथे कारवाया चालूच ठेवल्या.
पुरातत्व विभागाकडे सर्वेक्षणाची मागणी करणार ! – अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती ट्रस्ट आणि जन्मभूमी पक्षाचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी न्यायालयात दिवाणी दावा प्रविष्ट (दाखल) करण्यात येणार आहे. ज्ञानवापी आणि काशी ही सनातन धर्माची संपूर्ण जगात २ मोठी केंद्रे आहेत. या प्रकरणी भारतीय पुरातत्व खात्याकडे सर्वेक्षणाची मागणी केली जाईल. काशीप्रमाणे येथेही एक दिवस हिंदू पूजा करतील. (हिंदूंची वारसास्थळे परत मिळवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे, ही काळाची गरज ठरली आहे ! – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात