धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी त्यांनी धार्मिक भावनेतून हिंसाचार केल्याचा दावा !
आक्रमण करून १०० हून अधिक पोलिसांना घायाळ करणार्यांना, सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्यांना, अनधिकृत बांधकाम पाडण्यास विरोध करणार्यांना पाठीशी घालणार्या अशा पत्रकारांवरही हिंसाचाराचे समर्थन केल्याचा गुन्हा नोंदवून कारागृहात डांबले पाहिजे ! -संपादक
नवी देहली – उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या संदर्भात ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाकडून धर्मांधांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या वृत्तसंकेतस्थळाने एक चर्चासत्र आयोजित केले होते. याचे सूत्रसंचालन या वृत्तसंकेतस्थळाच्या संपादिका अरफा खानम शेरवानी यांनी केले होते. पत्रकार त्रिलोचन भट्ट, पत्रकार उमाकांत लखेरा आणि ‘द वायर’चे दुसरे संपादक याकूत अली यांचा चर्चासत्रात समावेश होता. या चर्चासत्रात पोलिसांवर आक्रमण करणार्या धर्मांधांनी बाजू मांडण्यात आली. तसेच धर्मांधांना निर्दोष ठरवून या आक्रमणाचा संपूर्ण ठपका प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यावर ठेवण्यात आला. ‘निवडणुका पाहून मुसलमानांना भडकावण्यात आले’ असे या वेळी सांगण्यात आले. (संपादक आणि संपादिका मुसलमान असल्यावर याहून वेगळे काय सांगितले जाणार ? मुसलमान आधी मुसलमान असतात आणि नंतर अन्य काही, हे अशा घटनांतून पुनःपुन्हा दिसून येते ! – संपादक)
सौजन्य: The Wire
चर्चासत्रात त्रिलोचन भट्ट म्हणाले की, त्यांच्यावर (धर्मांध मुसलमानांवर) राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुकाच्या) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची सिद्धता चालू आहे. त्यांनी दगडफेक केली हे मान्य करू; पण धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी त्यांनी धार्मिक भावनेतून असे केले असावे; (हिंदूंनी उद्या त्यांची धार्मिक स्थळे जी मुसलमान आक्रमकांनी बळकावली आहेत, ती परत घेण्यासाठी कायदा हातात घेतला, तर हे पत्रकार अशीच भूमिका घेतील का ? – संपादक) मग त्यांच्यावर रासुका लावणार का ? ते आतंकवादी नाहीत. (पोलीस ठाण्याला घेराव घालून पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारे आतंकवादी नाहीत, तर गांधीवादी आहेत, असे यांना वाटते का ? – संपादक) त्यांना थेट लक्ष्य केले जात आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात