Menu Close

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

प्रमाणपत्राच्या नावाखाली आस्थापनांकडून केवळ पैसे उकलण्याचा, तसेच अन्नप्रकारांच्या उत्पादनावर कोणतेच नियंत्रण नसल्याचा आरोप !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या प्रमुख संघटनांमध्ये ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’ ही एक संस्था आहे. आता उत्तरप्रदेश पोलिसांनी राज्यात ‘हलाल इंडियन’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ या अन्य मोठ्या संस्थाही कार्यरत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक 

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – काही मौलाना उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली टोळी सिद्ध करून पैसे कमवत असल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांच्या विशेष कृती दलाने (‘एस्.टी.एफ्.’ने) १२ फेब्रुवारी या दिवशी ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशीर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष महंमद अन्वर खान यांना मुंबईतून अटक केली. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली विविध आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

१. विदेशात निर्यात करण्यासाठी सिद्ध केलेल्या मालाखेरीज उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र असलेला कोणताही माल सिद्ध करता येणार नाही, तसेच विकताही नाही, अशी घोषणा स्वत: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केली होती. यासह उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्रासह वस्तू विकणार्‍या लोकांना तुरुंगात पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

२. पोलीस उपअधीक्षक दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील ‘एस्.टी.एफ्.’च्या पथकाने आरोपींकडून ४ आधारकार्ड, ४ पॅनकार्ड, ३ भ्रमणभाष संच, ४ ए.टी.एम्. कार्ड, २१ सहस्र ८२० रुपये रोकड, ३ वाहन परवाने आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

३. या आरोपींना ‘हलाल’ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, तरीही ते आस्थापनाकडून १० सहस्र रुपये घेऊन हे प्रमाणपत्र देत होते. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?

इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *