Menu Close

छत्तीसगडमध्ये भाजप सरकार धर्मांतर नियंत्रण विधेयक आणण्याच्या सिद्धतेत !

भाजप शासित एकेका राज्याने अशा प्रकारचा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी कायदा करणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.

काय आहे विधेयकामध्ये ?

१. ज्या व्यक्तीला धर्मांतर करायचे आहे, त्याला ६० दिवसांआधी जिल्हा दंडाधिकार्‍याकडे एक अर्ज भरावा लागेल. ज्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती असेल. त्यानंतर पोलीस या अर्जाची छाननी करतील. ‘धर्मांतर करण्यामागचे खरे कारण आणि उद्देश काय आहे ?’, याची पडताळणी केली जाईल.

२. बळजबरी, प्रभाव टाकून, फसव्या मार्गाने, लग्नाच्या माध्यमातून किंवा प्रथेचा वापर करून एका धर्मातून दुसर्‍या धर्मात धर्मांतर केले जाऊ शकत नाही. जर जिल्हा दंडाधिकार्‍यांना सदर अर्जामध्ये काही संशयास्पद आढळले, तर धर्मांतर बेकायदेशीर मानले जाणार आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *