काठमांडू (नेपाळ) – नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत आहेत. माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा हे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
A group in Nepali Congress Party gears up to declare Nepal as Hindu Rashtra
Kathmandu (Nepal) – Around 22 office bearers of the Nepali Congress Party are putting forward the declaration. Other party members are opposing the proposal to be included in the Party’s agenda.
Former… pic.twitter.com/YqXXWnc2ig
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 19, 2024
१. नेपाळी काँग्रेसच्या साधारण समितीची बैठक ललितपूर येथे होणार आहे. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेचा प्रस्ताव २२ सदस्यांनी मांडला असून याचिकेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे; मात्र पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने ते मान्य केलेले नाही. यावर हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेला पाठिंबा देणारे सदस्य चर्चा करण्याच्या विचारात आहेत. त्याला ते ‘वैदिक सनातन हिंदु राष्ट्र’ म्हणतात. नेपाळमधील ८१ टक्के नागरिक हिंदु आहेत.
A group in Nepali Congress gears up to raise the Hindu state agenda at Mahasamiti meetinghttps://t.co/gdOEJsTRrY
— The Kathmandu Post (@kathmandupost) February 18, 2024
२. कायद्यानुसार सर्वसाधारण समितीची बैठक प्रतिवर्षी बोलावण्यात यावी; परंतु विविध कारणांमुळे डिसेंबर २०२१ मध्ये १४ व्या सर्वसाधारण परिषदेपासून ती पुढे ढकलण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी निदर्शने झाली. काठमांडू पोस्टमधील एका लेखानुसार, माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्याकडे लोकांचा कल वाढत आहे. यामुळेच आता अनेक पक्ष हिंदु राष्ट्राचे समर्थन करतात, जेणेकरून त्यांना मतांचा लाभ मिळावा.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात