भारतात एखाद्या केंद्रीय मंत्र्याने असे वक्तव्य हिंदुत्व रक्षणासाठी केले, तर त्याला लगेच ‘जातीय’ ठरवले जाते !
क्वालालंपूर (मलेशिया) : मुसलमानेतरांनी इस्लामविषयी टिप्पणी करू नये, असे वक्तव्य मलेशियाच्या पंतप्रधानांच्या खात्याच्या मंत्री आझालिना ओथमन यांनी केले आहे. ‘मलेशियासारख्या बहुसांस्कृतिक देशामध्ये ऐक्य सांभाळण्यासाठी संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे’, असे मत आझालिना यांनी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.
आझालिना पुढे म्हणाल्या की,
१. मुसलमानेतरांनी माझ्या धर्माविषयी बोलू नये. मी आपल्या धर्माविषयी बोलत नाही, मग आपणही माझ्या धर्माविषयी बोलू नका. (असा धर्माभिमान भारतातील हिंदुत्वनिष्ठ असल्याचे म्हणवून घेणारे राजकीय पक्ष का दाखवत नाहीत ? किमान त्यांनी तरी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन न करता हिंदूंची न्याय्य बाजू उचलून धरायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. सामाजिक संकेतस्थळांवरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना हल्लीच्या युवकांनी काळजी घेतली पाहिजे. शासन युवकांना टीका करण्यापासून परावृत्त करत नाही; मात्र युवकांनी देशाच्या संस्कृतीचा विचार करून प्रतिक्रिया द्याव्यात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात