मुंबई – अश्लीलतेच्या संदर्भात कायदा व्हायला हवा, वस्त्रसंहिताही ठरवायला हवी आणि जे त्याचे उल्लंघन करतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पालकसंस्था, युवासंस्था बनवून त्यांनी या सूत्रावर एकत्र काम केले पाहिजे, अशा प्रकारची सूत्रे मी वर्ष २००४ मध्ये मांडली होती. ‘बलात्काराचे मुख्य कारण, अश्लील चित्रपट’ हे असेल, तर या विरोधातील मोहिमेला लोक जोडतील. देश विश्वगुरु होण्याच्या वाटेवर असतांना संस्कृतीवर आघात करणारी अश्लीलतेची ही आसुरी ताकद संपली नाही, तर आपण संपू. भारताकडे विश्व आज आशेने पहात आहे.
आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे. ८० टक्के आरोपी सांगतात की, त्यांनी अश्लील चित्रपट पाहून बलात्कार केले. या संदर्भात ४ मासांत खटला चालून १० ते २० वर्षांची शिक्षा होईल, ३ वर्षे जामीन मिळणार नाही, असा कायदा व्हायला हवा. ही लढाई राज्यघटनात्मक असेल; पण परशूप्रमाणे असेल, असे प्रतिपादन ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी केले.
ते २५ फेब्रुवारीला ‘फिल्मी दुनियेचे दुष्कर्म’ या विषयावर प्रकाश टाकणार्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे, ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’च्या सहसंस्थापिका स्वाती गोयल शर्मा उपस्थित होते, तसेच श्री. संजीव नेवर, भाषा सुम्बली हे ऑनलाईन जोडले होते.
The first foray of #SaveCultureSaveBharat Foundation, @GemsOfBollywood & @HinduJagrutiOrg to challenge perverted content makers in their den, Mumbai, was a grand success. When i spoke about a Law of Ethics Code to send such evil film makers to jail on charge of anti-national &… pic.twitter.com/DNS5zoDiRi
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) February 25, 2024
दादर पश्चिम येथील सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा आरंभ श्री गणेशाच्या श्लोकाने करण्यात आला. मान्यवर सर्वश्री उदय माहूरकर, रमेश शिंदे आणि श्रीमती स्वाती गोयल शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतीश कोचरेकर आणि सौ. जान्हवी भदिर्के यांनी केले. ‘यू ट्यूब’ प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थितांना ‘संस्कृती वाचवा, भारत वाचवा’ तसेच ‘हलाल जिहाद’ या विषयांवरील चित्रफीती ‘प्रोजेक्टर’च्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी कार्यक्रमाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला. ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’चे संस्थापक श्री. संजीव नेवर आणि श्रीमती भाषा सुम्बली यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले. कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या साहाय्य करणार्यांचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता सविता लेले यांनी म्हटलेल्या संपूर्ण ‘वन्देमातरम्’ने करण्यात आली.
विशेष सत्कार !
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवले जाणारे अश्लील आणि बीभत्स दृश्य असलेले चित्रपट, तसेच वेब सिरीज यांच्या विरोधात कृतीशील प्रयत्न करणार्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हिंदी चित्रपटांतून दाखवण्यात येणारी अश्लील आणि अयोग्य दृश्ये यांच्या विरोधात कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार श्री. उदय माहूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्या भारतीय जनता पक्षाच्या माहीम विधानसभा अध्यक्षा श्रीमती अक्षता तेंडुलकर यांचा सत्कार सौ. स्नेहल गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कथित ‘स्टार्स’ना आपल्या जीवनातून काढून टाका ! – श्रीमती स्वाती गोयल, जेष्ठ पत्रकार, तसेच सहसंस्थापिका ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’
हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठमोठे कलाकार स्वतःला ‘स्टार’ म्हणवून घेतात; मात्र यातील बहुतांश आपल्या देव, देश आणि संस्कृती यांची वर्षानुवर्षे अपकीर्ती करून नवीन पिढीला नासवण्याचे काम करत आहेत. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी इंग्रजी चित्रपट पाहून प्रेरणा घेतली. येशू ख्रिस्तांवर चित्रपट होऊ शकतो, तर हिंदु देवतांवर का नाही ? या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पुढे अनेक देवतांवर चित्रपट निर्माण केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत जिहादी षड्यंत्रांचा शिरकाव झाला. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून अश्लीलता आणि हिंसाचार पसरवला जात आहे. संस्कृतीद्रोही हिंदी चित्रपटसृष्टीला बळी न पडता या स्वयंघोषित ‘स्टार्स’ना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. या खोट्या आदर्शांना आपल्या जीवनातून कायमचे काढून टाका, तरच आपल्या कुटुंबाचे भले होईल !
मनोरंजनाच्या माध्यमातून पसरतोय भयावह आतंकवाद ! – संजीव नेवर, संस्थापक, ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’
आपण ऐकलेल्या आतंकवादापैकी सर्वांत भयावह आतंकवाद सध्या समाजात पसरत चालला आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणारा हा आतंकवाद ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात पोचला आहे. या प्लॅटफॉर्म्सवर पसरवल्या जाणार्या अश्लील चित्रणातील कलाकार संरक्षणात असतात; मात्र त्याला बळी पडणार्या सर्वसामान्य घरातील लहान मुली असतात. कोरोना काळात मुलांचे शालेय अभ्यास ज्या भ्रमणध्वनीत चालत होते, त्याच भ्रमणध्वनीमध्ये मुलांना ओटीटी ॲप्समधून घाणेरडे चित्रपट पाहायला मिळत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स परिनिरीक्षण मंडळाच्या क्षेत्रात येत नसल्याने हिंदी चित्रपटसृष्टी त्यामध्ये अश्लीलता आणि बीभत्सपणा पसरवत आहे. हे थांबायला हवे.
भ्रमणध्वनीतून काय घ्यायचे आणि काय नाही ? हे ठरवायला हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आदर्श कुटुंबव्यवस्था आज केवळ भारतात शेष आहे; मात्र इथेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आणण्यात आली आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ भारतात आणण्याचे कार्य हिंदी चित्रपटसृष्टीने केले आहे. आज लिव्ह इन रिलेशनशिप न्यायालयाची डोकेदुखी बनली आहे. आज भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच स्मार्ट झाला; पण भ्रमणध्वनीवर येणारी कोणती माहिती घ्यायची आणि कोणती घ्यायची नाही ? हे ओळखण्यासाठी आपल्यालाही ‘स्मार्ट’ होण्याची आवश्यकता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुचित प्रकारांना हिंदु जनजागृती समितीने वेळोवेळी विरोध केला आहे. समितीच्या विरोधामुळे अल्ट बालाजीच्या एकता कपूर यांना क्षमा मागावी लागली. हिंदु देवतांची नग्न चित्रे काढणार्या म.फी. हुसेन यांना भारत सोडून विदेशात जावे लागले. येणार्या काळात अश्लीलता रोखण्याचे काम सरकार करेलच; मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात असलेल्या भ्रमणध्वनीवर येणार्या माहितीतून काय घ्यायचे आणि काय नाही घ्यायचे ? हे आज आपल्याला ठरवावे लागेल.
चित्रपटसृष्टीतील विकृत बाजू समोर आणणे आवश्यक ! – भाषा सुम्बली, द काश्मीर फाइल्स चित्रपटातील अभिनेत्री
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांतील, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जाणार्या वेब सिरीजमधील अश्लील आणि बीभत्स दृश्यांनी आजच्या युवा पिढीला दूषित केले केले आहे. आजचा युवा सांस्कृतिक चेतनेपासून दूर जाऊ लागला आहे. तरुण पिढीला संवेदनाहीन करण्याचे काम हिंदी चित्रपटसृष्टीने केले आहे. स्त्रियांच्याप्रती मानसिकतेमध्ये विकृती आणण्याचाही प्रयत्न ही चित्रपटसृष्टी करत आहे. या विरोधात सामान्य जनतेला जागृत करण्याचे काम आज आवश्यक बनले आहे.