केंद्रातील सरकार साम्यवाद्यांवर यासाठी दबाव का आणत नाही ?
थ्रीशूर : भाजपचे केरळ राज्याचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम् राजशेखरन् यांनी शासनकर्ते साम्यवादी पक्षाला चेतावणी देऊन राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करण्याची मागणी केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यावर मार्क्सवादी कार्यकर्त्यांच्या हिंसाचारास उधाण आले असून भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि हिंदू यांच्यावर झालेल्या आक्रमणात अनेकजण गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.
कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेविरुद्ध २१ मे या दिवशी थ्रीशूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. मार्क्सवादी पक्षाचे प्रदेश सचिव कोडीयेरी बालकृष्णन् यांनी उलट भाजपच हिंसाचार फैलावत आहे, असा आरोप केला आहे. त्यावर आक्षेप घेतांना कुम्मानम् राजशेखरन् यांनी बालकृष्णन् यांच्या समवेत हिंसाग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती पहाण्याची सिद्धता दर्शवली. या निवडणुकीत साम्यवादी पक्षाला बहुमत मिळाले असले, तरी भाजपला ३० लक्ष मते पडली. त्यामुळे साम्यवादी पक्षात अस्वस्थता पसरली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात