Menu Close

कोपरगाव (अहिल्यानगर) येथील महाविद्यालयात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावले !

  • हिंदू संतप्त

  • गुन्हा नोंद

  • एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !
  • या प्रकरणी धर्मनिरपेक्षतेला काळीमा फासणार्‍या प्राचार्यांना बडतर्फ करण्याची मागणी हिंदूंनी लावून धरली पाहिजे !
  • एकाही विद्यार्थ्याने नमाजपठणास नकार दिला नाही. यावरून विद्यार्थ्यांना हिंदु धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! -संपादक 

कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र) – राष्ट्रसंत जनार्दनस्वामी हॉस्पिटलच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रसंत जनार्दनस्वामी वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्यांसह इतरांनी विद्यार्थ्यांना नमाजपठण करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केरळ राज्यातून एक इस्लामी अभ्यासक कार्यशाळा घेण्याच्या नावाखाली महाविद्यालयात आला होता. महाविद्यालयातील एका मुसलमान शिक्षिकेचा या कार्यशाळेत सहभाग होता.

महाविद्यालयाच्या एका सभागृहात हा प्रकार घडला; परंतु या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले की, त्यांची अनुमती या कार्यक्रमासाठी घेण्यात आली नव्हती. (कार्यक्रमाला स्वत: प्राचार्य उपस्थित असतांना व्यावस्थापनाकडून असे स्पष्टीकरण दिले जाणे हास्यास्पदच होय ! – संपादक)

२६ फेब्रुवारीच्या रात्री हिंदुत्वनिष्ठांनी संताप व्यक्त करून या घटनेचा जोरदार निषेध केला. सकल हिंदु समाज आणि येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पोलीस ठाण्यावर जाऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. महाविद्यालय प्रशासन आणि सकल हिंदु समाज यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट केल्यावर संबंधितांवर गुन्हा नोंद झाला आहे.

राष्ट्रसंत जनार्दनस्वामी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे समजते. यात सर्वधर्मसमभावासाठी नमाजपठण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण संबंधितांनी दिले. (मग हिंदूंची प्रार्थनाही घेणे अपेक्षित होते. ती का घेतली नाही ? – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *