पी.एच्.डी. करणारी सुशिक्षित हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडते, यावरून हिंदु तरुणींना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून दिसून येते ! -संपादक
मंगळुरू (कर्नाटक) – येथील कोटेकारूजवळ असलेल्या पदव्युत्तर केंद्रात ‘पी.एच्.डी.’ करणारी विद्यार्थिनी चैत्रा हेब्बार एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाली आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगण्यात येते. चैत्रा हिला पुत्तूरूच्या कूर्नड्क येथे रहात असलेल्या मूळ बंट्वाळ येथील धर्मांध तरुणाने गांजाचे व्यसन लावले होते. या मुसलमान तरुणानेच चैत्राला पळवल्याचा संशय व्यक्त होत आहे. चैत्राच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
१. चैत्रा वास्तव्य करत असलेल्या ठिकाणी संशयित मुसलमान तरुण तिला भेटण्यास येत असल्याविषयी चैत्राच्या घरच्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली होती.
२. त्यानंतर काही दिवसांतच चैत्रा हेब्बार बेपत्ता झाली आहे. पोलिसांत तक्रार नोंदवून १ आठवडा उलटला, तरी चैत्राचा पत्ता लागलेला नाही.
३. ‘आणखी २ दिवसांत चैत्राचा पत्ता लागला नाही, तर उळ्ळाल पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी बजरंग दल कर्नाटक प्रांत संचालक मुरळीकृष्ण तडका यांनी दिली आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात