Menu Close

तेलंगाणामध्ये खोदकामाच्या वेळी सापडली १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची २ मंदिरे !

नलगोंडा (तेलंगाणा) – तेलंगाणाच्या कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ भूमीचे खोदकाम करत असतांना त्यांना दगड तुटण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी माती बाजूला करून पाहिले, तेव्हा तिथे दुर्मिळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील २ मंदिरे सापडली. ही मंदिरे १ सहस्र ३०० वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. येथे शिलालेख सापडला आहे तो १ सहस्र २०० वर्षे जुना आहे. एका मंदिरात शिवलिंगाचा काही भाग शेष आहे, तर दुसर्‍या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे, जी पूर्णपणे सुरक्षित आहे. या मंदिरांची अनोखी वास्तूशैली त्यांचे वेगळेपण दर्शवते.

१. ‘पब्लिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्री’चे डॉ. एम्.ए. श्रीनिवास आणि एस्. अशोक कुमार यांचे पथक येथे खोदकाम करत होते. शास्त्रज्ञांनुसार हा शिलालेख ८ व्या किंव्या ९ व्या शतकाच्या पूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेव्हा बादामी परिसरात चालुक्य वंशाचे शासन होते.

२. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ. मुनिरत्नम रेड्डी यांनी सांगितले की, सापडलेल्या शिलालेखावर ‘गंडालोरुंरु’ हा शब्द लिहिण्यात आला आहे. हा त्या काळातील शब्द आहे. कन्नडमध्ये ‘गंडा’चा अर्थ ‘नायक’ किंवा वीर असा तेव्हा होत असेल. बादामी चालुक्य मंदिरांमध्ये कदंब नागर शैलीचा प्रयोग करण्यात आला आहे. हे तेलंगाणातील एक दुर्मिळ वास्तूशिल्प आहे. येथे पंचकुटा नावाने ५ मंदिरांचा समुह आहे. या मंदिरांच्या शिलालेखांवरही ‘गंडालोरुंरु’ शब्द लिहिलेला आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *