Menu Close

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर प्राणघातक आक्रमणाचा प्रयत्न !

एका विशिष्ट वेळी एवढा मोठा जमाव हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण करतो, याचा अर्थ हे आक्रमण पूर्वनियोजित होते, हे स्पष्ट होते. असे असतांना पोलिसांना त्याची माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपा काढत होते का ? -संपादक 

पू. संभाजीराव भिडे गुरुजी

मनमाड (नाशिक, महाराष्ट्र) – २९ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास पू. संभाजी भिडेगुरुजी येवला येथून मालेगाव येथे जात असतांना समाजकंटकांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

त्यामध्ये मोठ्या संख्येने आलेल्या आंबेडकरवाद्यांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांची गाडीवर आक्रमण करून त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. राज्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

सौजन्य : Sudarshan मराठी

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित

या वेळी पोलिसांकडूनन आक्रमणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला; तरीही तो अत्यंत अत्यल्प होता. ‘पोलिसांनी हे आक्रमण का रोखले नाही ?’ असा प्रश्‍नही हिंदुत्वनिष्ठ करत आहेत. या वेळी आक्रमणकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून ‘मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. या वेळी अश्‍लील शब्दांतही घोषणा देण्यात आल्या. काही तरुण-तरुणींनी गाडीसमोर येऊन, गाडी अडवून काचांवर आणि गाडीच्या पुढील भागावर जोरजोराने हात मारत शिवीगाळ केली. याच वेळी एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. या आक्रमणामध्ये गाडीच्या पुढच्या दिव्यांच्या काचा फुटल्या. मनमाड पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना कह्यात घेतल्याचे समजते.

या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पू. संभाजी भिडेगुरुजींना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येत आहे.

पू. भिडेगुरुजींवर जीवघेणे आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि गुजरात राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

पू. भिडेगुरुजींवर झालेल्या भ्याड आक्रमणाचा निषेध ! पूजनीय भिडे गुरुजी म्हणजे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांच्यावर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. मनमाड येथील घटनाही तशीच आहे. पू. गुरुजींच्या वाहनावर पूर्वग्रहदूषितपणे आक्रमणे करणे, त्यांना काळे ध्वज दाखवणे, घोषणा देणे या कृती पोलिसांच्या समक्ष केल्या जातात. जे लोक राज्यघटनेविषयी बोलतात, त्याच राज्यघटनेचा अवमान करून कायदा हातात घेऊन पू. गुरुजींसारख्या व्यक्तीवर आक्रमण करणे, हे कोणत्या तत्त्वात बसते ? अशा घटनेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारे जीवघेणे आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *