केंद्र सरकारनेच देशपातळीवर मंदिरांच्या २ किलोमीटर परिसरात मांस आणि मद्य विक्रीवर बंदी घालणारा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघात मांसाची विक्री करणारी दुकाने बंद करण्यात आली आहेत. आठवडाभरापूर्वी याविषयी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र नोटीस देऊनही दुकाने चालू होती. वाराणसीच्या बेनिया भागातील २६ दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची ही मोहीम सध्या चालू रहाणार आहे.
Action against 26 shops selling meat within 2 km radius of Kashi Vishwanath Mandir.
👉 Hindus think that the Central Government should make a Nationwide law banning the sale of meat and liquor within 2 kilometers of temples.#Varanasi pic.twitter.com/n13DJHYMEk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
महापालिकेच्या १८ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत, महापालिका अधिनियम-१९५९ च्या कलम ९१(२) अन्वये, नगरसेवक इंद्रेश कुमार सिंह यांनी श्रीकाशी विश्वनाथ धामच्या आजूबाजूला असलेल्या मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. काशी विश्वनाथ धामच्या २ किलोमीटर परिसरात मांसाच्या दुकानांवर बंदी घालण्यास सभागृहाने संमती दिली होती. या मोहिमेच्या अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणानंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात बेनियाबाग आणि न्यू रोड परिसरातील २६ दुकानांना नोटीस दिली होती.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात