सनातन धर्माला संपवण्याचे विधान करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !
सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना कठोर शिक्षा करावी, अशी सनातन धर्मियांची मागणी आहे ! – संपादक
नवी देहली – ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा कसा करत आहात ?’ असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले. उदयनिधी यांनी काही मासांपूर्वी सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याला संपवण्याचे विधान केले होते. या संदर्भात उदयनिधी यांनी त्यांच्यावरील आरोपांना विरोध करणारी आणि कारवाईपासून संरक्षणासाठी दाद मागणारी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने त्यांना फटकारले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मार्च या दिवशी होणार आहे.
सौजन्य इंडिया टूडे
तुम्ही मंत्री असल्याने अशा गोष्टींच्या परिणामांची कल्पना असायला हवी !
तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत मिळणार्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांचा अवमान केला. आता तुम्ही कलम ३२ नुसार तुम्हाला मिळालेल्या दाद मागण्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका कशी करता ? तुम्ही जे काही म्हणाला आहात, त्याचे परिणाम काय होतील, हे तुम्हाला ठाऊक नव्हते का ? तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही, तर एक मंत्री आहात. तुम्हाला अशा गोष्टींच्या परिणामांची कल्पना असायला हवी, अशा शब्दांत न्यायालयाने स्टॅलिन यांचे कान टोचले.
Supreme court rebukes #UdhayanidhiStalin for statements aimed at destroying Sanatana Dharma.
How do you claim higher rights by misusing freedom of expression ?
Devout Hindus demand stringent punishment for Udhayanidhi by the Supreme Court Of India.pic.twitter.com/4u0miqKbFc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 4, 2024
काय म्हणाले होते उदयनिधी ?
‘सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचे समूळ उच्चाटन करायला हवे. डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना यांसारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचे उच्चाटनच करायला हवे. त्याचप्रमाणे सनातन धर्माचेही उच्चाटन व्हायला हवे’, असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात