द्रमुकचे खासदार ए. राजा यांचे विधान
- रावणाचाही श्रीरामावर विश्वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !
- प्रभु श्रीरामाला न स्वीकारणार्यांना हिंदूही कधी स्वीकारणार नाहीत, हे राजा यांच्यासारख्या उद्दाम द्रमुकवाल्यांना सांगण्याची वेळ आली आहे. या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी तमिळनाडूतील हिंदूंनी प्रयत्न करावेत ! -संपादक
नवी देहली – द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भगवान श्रीराम आणि रामायण यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ भाजपचे नेते अमित मालवीय यांनी एक्स वर प्रसारित केला आहे. यात ए. राजा म्हणत आहेत, ‘तुम्ही म्हणाल. तर तो देव आहे. तुम्ही ‘जय श्रीराम’ किंवा ‘ भारत माता की जय’ म्हणत असाल, तर आम्ही ते कधीच मान्य करणार नाही. तमिळनाडू हे कधीच स्वीकारणार नाही. आम्ही रामाचे शत्रू आहोत.’ माझा रामायणावर विश्वास नाही आणि प्रभु रामावरही नाही.
सौजन्य News18 India
१. ए. राजा यांच्या या विधानावर अयोध्येतील हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी राजू दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, याविषयी आम्ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
‘I don’t believe in Ramayana or Lord Ram !’ – DMK MP A Raja
Even Raavan did not believe in Shree Ram; it does not matter to Hindus if A Raja does not believe in Him. #DMK is atheist anyway.
It is time to send a message to egoistic DMK members like Raja that Hindus will never… pic.twitter.com/ArHhg4XxS9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2024
२. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ए. राजा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले की, ‘ए. राजा म्हणतात की, ते ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’ कधीच स्वीकारणार नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना हे मान्य आहे का ?
स्रोत: दैनिक सनातन प्रभात