अंकारा (तुर्की) : मुस्लिम परिवाराने कुटुंब नियोजनात सहभागी न होता जास्तीच जास्त मुले जन्माला घालावीत, असे वादग्रस्त विधान तुर्कीचे राष्ट्रपती रेचप ताईत एरदोन यांनी केले आहे. राष्ट्रपतींच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
टीव्हीवरील एका लाईव्ह कार्यक्रमात बोलताना एरदोन म्हणाले, ‘कुटुंब नियोजनात मुस्लिम समाजाने सहभागी होण्याची गरज नाही, मुले ही अल्लाची देण असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, तरच मुलांची संख्या वाढवता येईल.
राष्ट्रपतींच्या वादग्रस्त वक्तव्याचा महिला संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी जोरदार निषेध नोंदविला आहे. कोणत्या महिलांनी किती मुले जन्माला घालावीत हा त्या-त्या महिलांचा अधिकार आहे. अधिक मुले जन्माला घालण्यासाठी राष्ट्रपती कोणत्याही महिलेवर दबाव टाकू शकत नाही. कुटुंब नियोजनात कोणी सहभागी व्हावे किंवा कोणी होवू नाही, हे सांगण्याची गरज नसल्याचेही महिला संघटनांनी म्हटले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स