दादरी कांडला असहिष्णुता म्हणणारे तथाकथित ‘सेक्युलर ब्रिगेडी’ आता या विषयवर काही बाेलतील का ? – संपादक, हिंदुजागृती
नोएडा : दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास अहवालात देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. या आधी पोलिसांनी एका स्थानिक प्रयोगशाळेमध्ये त्याचे नमूने तपासले होते. त्यावेळी हे बीफ नसून मटण असल्याचे सांगण्यात आले होते.
दादरी हत्याकांडाचा खटला एका फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. या खटल्यातील आरोपींनी इखलाकच्या घरात आढळलेल्या मांसाचे नमून तपासण्यात यावे, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. त्यानंतर कोर्टाने हा अहवाल मागवला होता. हा अहवाल सार्वजनिक करण्यात येऊ नये, अशी मागणी सरकारी वकिलाकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टाने सरकारी वकिलाची मागणी फेटाळून लावत अहवाल सार्वजनिक करण्यास सांगितले.
इखलाक यांच्या घरातून मिळालेल्या मांसाचे नमूने पोलिसांनी मथुरा येथील एका प्रयोगशाळेत वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, ‘इखलाक यांच्या घरात मिळालेले मांस गाय किंवा गायीसारख्या प्राण्याचे असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात गोमांस खाण्यावर बंदी नाही, मात्र गो-हत्येला विरोध आहे. त्यामुळे दादरी प्रकरणाच्या चौकशीची दिशा निश्चित व्हावी या करता प्रयोगशाळेचा अहवाल महत्वाचा असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांचा तपास हा गोहत्याप्रकरणी सुरू नसून इखलाख यांच्या हत्येमागील कारण शोधण्यासाठी सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दादरीत राहणाऱ्या इखलाखने गोमांस खाल्ले आणि घरातही साठवून ठेवले असा आरोप करत काही जणांनी ५० वर्षाच्या इखलाखला मारहाण केली. या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या इखलाख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, प्रयोगशाळेतील तपास अहवाल हाती आल्यानंतर इखलाख यांच्या कुटुंबियांनी मात्र गोमांस खाल्ले नसल्याचे म्हटले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स