Menu Close

वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून बेकायदेशीररित्या धार्मिक विधी !

  • दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
  • शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि हिंदू यांनी संबंधित अधिकार्‍यांना वेळीच खडसावून हे प्रकार बंद होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघटित व्हावे !
  • लोहगडावर अवैध दर्गा उभारण्यानंतर गडाच्या पायथ्याची भूमीही बळकावण्याचा प्रयत्न !
  • एकीकडे धर्मांध मुसलमान पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांना डावलून हिंदूंच्या प्राचीन स्थळी बेकायदेशीर धार्मिक कृत्य करतात, तर दुसरीकडे प्राचीन मंदिरांत पूजा करण्याची अनुमती मिळावी, यासाठी हिंदू आंदोलने करून मागण्यांची निवेदने देतात. धर्मनिरपेक्षतेला काळीमा फासणारी ही परिस्थिती भारतासाठी लांच्छनास्पदच ! -संपादक 

पुणे  (महाराष्ट्र) – लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून येथे मुल्ला (शरीयत आणि इस्लामी सिद्धांत यांचा अभ्यासक) आणि मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) येत असून सायंकाळपासून पहाटेपर्यंत काही धार्मिक प्रकार केले जात आहेत. स्थानिक दुर्गप्रेमींच्या विरोधानंतरही हे विधी चालूच आहेत.

१. लोहगड हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. काही वर्षांपूर्वी या गडावरील एका दगडावर हिरवी चादर टाकण्यात आली. त्यानंतर तेथे एक फकीर येऊन बसला. गडावर एक मजार (मुसलमानांचे थडगे) बांधण्यात आली. मागील काही वर्षांपासून या मजारीच्या ठिकाणी हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्याकडून बेकायदेशीरपणे उरूस (मुसलमानांचा धार्मिक कार्यक्रम) साजरा करण्यात येत होता.

२. कोरोना महामारीच्या काळात लोहगडावरील या मजारीच्या चारही बाजूंनी भिंती बांधून दर्गा उभारण्याचे काम चालू करण्यात आले. या विरोधात स्थानिक दुर्गप्रेमींकडून पुरातत्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

३. स्थानिक शिवप्रेमींच्या विरोधानंतर मागील २-३ वर्षांपासून येथील उरूस बंद आहे. गडावर ज्याप्रमाणे धार्मिक विधी चालू करून अवैधपणे दर्गा उभारण्यात आला, त्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी धार्मिक विधी चालू करून वन विभागाची भूमी हडपण्याची भीती दुर्गप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

भूमी जिहादद्वारे भूमी हडप करण्याचे षड्यंत्र ! – विश्‍वनाथ जावलिकर, अध्यक्ष, मावळ अ‍ॅडव्हेंचर चॅरिटेबल ट्रस्ट आणि गड-किल्ले चॅरिटेबल ट्रस्ट

लोहगडावरील विसापूर बुरुजाच्या खाली गायमुख खिंडीमध्ये मागील काही दिवसांपासून मुल्ला-मौलवी रहात आहेत. सायंकाळपासून या ठिकाणी काही मुसलमान लोक येतात. रात्री-अपरात्री येथे धार्मिक विधी केले जातात. मी स्वत: तेथे जाऊन हा प्रकार पाहिला आहे. हा प्रकार रोखण्याविषयी आम्ही दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांना कळवले आहे; मात्र अद्यापही हे प्रकार चालू आहेत. हे भूमी जिहादचे षड्यंत्र आहे. भूमी जिहादद्वारे ही भूमी हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *