तेलंगाणामधील हिंदु संघटनांचे जिल्हाधिकार्यांकडे निवेदन
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये. बंगालमधील हिंदूंची दयनीय स्थिती पहाता केंद्र सरकारनेच तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक ! -संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – बंगालमध्ये हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांनी गरीब हिंदु महिलांवर अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्या दारुल उलूम संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी अभिनेत्री कराटे कल्याणी याही उपस्थित होत्या.
हे निवेदन देणार्यांमध्ये एकता मंच, राष्ट्रीय शिवाजी सेना, हिंदु दलित सेना, भारत सनातन संघ, सनातन हिंंदु संघ, छत्रपती शिवाजी फाउंडेशन, हिंदु जनजागृती समिती, धर्मवीर अध्यात्म चैतन्य वेदिका इत्यादी हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
हिन्दुओ ने जबाब नही दिया क्या फिर??