Menu Close

जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

  • बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी !

  • पू. भिडेगुरुजी यांना सुरक्षा प्रदान करावी !

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी !

जळगाव (महाराष्ट्र) – बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. तेथिल पोलिसांची स्थिती पहाता, तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात एकमताने करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता जळगाव महानगरपालिकेच्या समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे, हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, अधिवक्ता निरंजन चौधरी, योग वेदांत सेवा समितीचे श्री. अनिल चौधरी, राष्ट्रीय बजरंग दलाचे सहमंत्री श्री. प्रविण कोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल कदम, श्री. गजू तांबट, रणरागिणी शाखेच्या कु. धनश्री दहीवदकर, धर्मप्रेमी श्री. पंकज वराडे यांनी संबोधित केले.

मुलींवर अत्याचार करणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘विनियार्ड ब्लेसेड चर्च’च्या पास्टरवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही आंदोलनात केली गेली. याच मागण्यांच्या अनुषंगाने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी सौ. मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री दिग्विजय ठाकरे, नरेंद्र चौधरी, योगेश विसपुते, देवबा गुरव, राहुल मोरे, हर्षल बोरसे, ओम चौधरी, हर्षल देसाई, मयूर चौधरी आणि हिंदु जनजागृती समितीचे राहुल मराठे उपस्थित होते. तळोदा येथेही तहसीलदार लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री अमन जोहरी, पराग राणे, पारस परदेशी, कार्तिक शिंदे, चिंटू जोहरी, किरण ठाकरे, आकाश भोई, योगेश चव्हाण, पवन भोई, नंदू राजपूत उपस्थित होते. यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

धर्मप्रेमींनी दिलेले निवेदन वाचतांना नंदुरबारच्या जिल्हाधिकारी सौ. मनीषा खत्री

ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !

नुकतेच मनमाड (जिल्हा नाशिक) येथे पू. भिडेगुरुजी यांचे वाहन अडवून त्यावर काही समाजकंटकांनी आक्रमण केले. त्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यामागे कुणाचा कुटील हात आहे, हे शोधून काढून त्यांनाही कारावासात डांबावे अन् पू. गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *