Menu Close

देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा ? – भाजप आमदार टी. राजासिंह

  • राजधानीत पोलीस अधिकार्‍याने नमाजपठण करणार्‍यांना लाथ मारल्याचे प्रकरण

  • राजासिंह यांच्याकडून देहली पोलिसांचे समर्थन !

  • देहली पोलिसांचे कृत्य लज्जास्पद असल्याची काँग्रेसची टीका !

  • मुसलमानांच्या लांगूलचालनापायी भारताला देशोधडीला लावण्यात काँग्रेसची संपूर्ण हयात गेली. त्यामुळे नेहमीप्रमाणे तिने आताही कायदा मोडणार्‍या मुसलमानांचे समर्थन करणे, यात आश्‍चर्य ते काय ?
  • काँग्रेसने अशी टीका काही वर्षांपूर्वी पोलिसांनी मुंबई विमानतळावर जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या भक्तांवर केलेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेच्या वेळी केला नाही, हे लक्षात घ्या !
  • एरव्ही हिंदूंना ‘धर्म घरातील चार भिंतींमध्ये ठेवा’, असा उपदेश करणारे पुरो(अधो)गामी रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांंविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक 
भाजप आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – उत्तर देहलीतील इंद्रलोक परिसरात ८ मार्चच्या दुपारी रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला. त्यामुळे तोमर यांना देहली पोलिसांनी निलंबित केले. यासंदर्भात भाजपचे भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी मनोज तोमर यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, देशभरात ६ लाख मशिदी असूनही रस्ते अडवून नमाजपठण करण्यात कोणता शहाणपणा आहे ? या प्रकरणी देहली पोलिसांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. पोलिसांनी (मनोज तोमर यांनी) कोणतीही चूक केलेली नाही.

८ मार्च, शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तेथील मुसलमानांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. प्रकरण तापल्याने तोमर यांना निलंबित करण्यात आले. या एकूण प्रकरणावरून गेले २४ घंट्यांत ‘एक्स’वरून पुष्कळ चर्चा होत आहे. ‘#IStandWithManojTomar’, ‘दिल्ली पुलिस’, ‘रोड जाम’, ‘मनोज तोमर’ अशा विविध ‘हॅशटॅग’ आणि ‘कीवर्ड्स’ यांनी सहस्रावधी हिंदूंनी मनोज तोमर यांचे समर्थन केले आहे. दुसरीकडे काही धर्मांध, तसेच काँग्रेस आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी मुसलमानांचे समर्थन करत पोलिसांच्या कृतीला चुकीचे ठरवले.

मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काही काँग्रेसी !

काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या, ‘हे (लाथ मारल्याचे कृत्य) अमित शाह यांच्या देहली पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे – ‘शांतता, सेवा, न्याय’. यासाठी ते पूर्ण झोकून देऊन काम करत आहेत.’
काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी म्हणाले, ‘हा द्वेष का आहे ? या व्यक्तीला कदाचित् मानवतेची तत्त्वे समजत नाहीत.’
देहली काँग्रेसने म्हटले की, ‘फारच लज्जास्पद ! रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या लोकांना देहली पोलीस लाथ मारत आहेत. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकते ?’

घटनेचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून लोकांना भडकावले जात आहे ! – सामाजिक माध्यमांतून टीका

उपनिरीक्षक मनोज तोमर

सामाजिक माध्यमांत एका व्यक्तीने या घटनेचा दीड मिनिटांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, जेव्हा रस्त्यावर नमाजपठणासाठी काही लोक एकत्र आले होते, तेव्हा त्यांना दूर जाण्यास सांगण्यात आले; पण ते एकत्र आले आणि नंतर त्यांनी पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून लोकांना भडकावून पोलिसांना दोषी ठरवले जात आहे.
चंदन शर्मा नावाच्या एकाने लिहिले आहे की, उपनिरीक्षक मनोज तोमर यांना  जमावाकडून वारंवार चिथावणी दिली जात होती.

रस्त्यावर नमाजपठण करणे गुन्हा नव्हे का ? – अधिवक्ता विनीत जिंदाल, सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी या प्रकरणावर स्वत:चे मत मांडणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.

१. देहलीतील रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या लोकांना असंवेदनशील पद्धतीने हटवणार्‍या देहली पोलिसांच्या अधिकार्‍यावर कारवाई झाली, परंतु रस्ता रोखून नमाजपठण करणे योग्य आहे का ?

२. रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीने नमाजपठण करणार्‍या लोकांवर गुन्हा नोंद केला गेला का ?

३. रस्ता बंद करून लोकांचे प्राण संकटात टाकणे, हा गुन्हा नव्हे का ?

अधिवक्ता जिंदाल पुढे म्हणाले की, मी देहली पोलिसांकडे आग्रह करतो की, त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने रस्ता रोखून, वाहतुकीत अडथळे निर्माण करून पोलीस अधिकार्‍यावर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *